पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती २०२१ - ऑनलाईन प्रश्नमंजुषा..
ध्याच्या काळातील ऑनलाईन तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने पुणे मनपा मॉडेल शाळा क्र. ७४ मुलींची या शाळेतील विद्यार्थी यांसाठी यावेळच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या १०५ व्या जयंती निमित्त ऑनलाईन ऑनलाईन प्रश्नमंजुषा आयोजित केली आहे...
यामधून खालील हेतू साध्य होतील...
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची माहिती मिळेल...
विद्यार्थी सहभाग वाढेल..त्यांच्यात ज्ञानाची चढाओढ निर्माण होईल...
विनामुल्य सहभाग प्रमाणपत्र मिळेल...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती २०२१ - ऑनलाईन प्रश्नमंजुषा..
सध्याच्या काळातील ऑनलाईन तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने पुणे मनपा मॉडेल शाळा क्र. ७४ मुलींची या शाळेतील विद्यार्थी यांसाठी यावेळच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ऑनलाईन ऑनलाईन प्रश्नमंजुषा आयोजित केली आहे...
यामधून खालील हेतू साध्य होतील...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती मिळेल...
सर्व सहभागी विद्यार्थ्यांना आकर्षक प्रमाणपत्र अपोआप मिळेल...
विद्यार्थी सहभाग वाढेल..त्यांच्यात ज्ञानाची चढाओढ निर्माण होईल...
विनामुल्य सहभाग प्रमाणपत्र मिळेल...
कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून उत्साहात साजरा होत आहे. ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ मराठी साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ मध्ये झाला होता. कवितेमध्ये रमतांना कुसुमाग्रजांनी कथा, कादंबरी, नाटक, ललित वाड्यमयातही मुक्त विहार केला. वयाच्या १७व्या वर्षापासून 'बालबोधमेवा' या मासिकातून कुसुमाग्रजांनी कविता आणि ललित साहित्य लिहायला सुरुवात केली. १९४२मध्ये प्रसिद्ध झालेला 'विशाखा' हा त्यांचा काव्य संग्रह साहित्यातला ठेवा आहे.
सामाजिक अन्याय, विषमता यावर कुसुमाग्रजांनी आपल्या लेखणीतून प्रहार केला. केवळ लिखाण करुन ते थांबले नाही तर चळवळींमध्येसुद्धा त्यांचा सहभाग होता. त्यामुळे एका अर्थाने कुसुमाग्रज सामाजिक चळवळीचे प्रणेते होते.
स्पर्धकहो, चला तर मग वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित साजऱ्या होणाऱ्या जागतिक मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी होऊ या... आणि प्रमाणपत्र मिळवू या..
सबंध भारताचे आराध्य व प्रेरणास्थान असणारे स्वराज्याचे संस्थापक, सकल मराठी जनांचा स्वाभिमान असणारे स्वराज्याचे पहिले छत्रपती यांच्या जयंती निमित्त खालील प्रश्नमंजुषा घेण्यात येत आहे. सर्व भारतीय, महाराष्ट्र राज्यात राहणारे तसेच पुण्याच्या मातीशी संबंध असणाऱ्या प्रत्येकास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातून कायम प्रेरणा मिळावी व त्यांचा जाज्वल्य इतिहास कायम ज्ञात राहावा याच उद्देशाने सदरच्या प्रश्नमंजुषेचे आयोजन केले आहे.
प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यास सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र मिळेल.
ज्या विद्यार्थ्यांकडे स्वत:चा इमेल नाही त्यांनी शिक्षकांचा इ-मेल टाकावा.