शैक्षणिक वर्ष २०२१-२२ :
पं. दीनदयाळ विद्यालयात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ वाजत गाजत जल्लोषात स्वागत...
शाळा प्रवेशानिमित्त सरस्वतीपूजन
शालेय परिसराची सजावट व रांगोळी
मा. सहाय्यक प्रशासकीय अधिकारी यांच्या हस्ते चॉकलेट वाटप..
चॉकलेट वाटप करतांना
कोरोना परिस्थितीमुळे दरवर्षी जून महिन्यात सुरु होणाऱ्या शाळा याही वर्षी सुरु होऊ शकल्या नाहीत. म्हणूनच ऑनलाईन माध्यमातून शालेय शिक्षण सुरु ठेवण्यात आले. शाळा बंद असूनही शिक्षण मात्र सुरु होते. आता जसजसे कोरोनाचा संसर्ग कमी होत आहे तसे शासनाच्या निर्देशानुसार शाळा सुरु होत आहेत.
याच पार्श्वभूमीवर पंडित दीनदयाळ विद्यालयातील विद्यार्थ्यांना देखील ऑफलाईन शाळेत बोलविण्यात आले व आज शुक्रवार दि. १७.१२.२०२१ रोजी इ. १ ली इ. ७ वी च्या सर्व विद्यार्थ्यांना बोलावून पुन्हा एकदा शाळा सुरु करण्यात आली.
विद्यार्थी जवळपास मार्च २०१९ नंतर तब्बल अडीच वर्षानंतर इ. १ ली पासूनचे विद्यार्थी शाळेत येणार असल्याने त्यांचे शाळेतर्फे जल्लोषात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शालेय परिसर कोरोना नियमांचे पालन करून स्वच्छ करण्यात आला, निर्जंतुकीकरण करण्यात आले व अंगणात रांगोळी घालण्यात आली. तसेच शालेय इमारत देखील सजविण्यात आली. विद्यार्थ्यांना प्रवेश घेतांना हातावर सनीटायझर देण्यात आले तसेच त्यांचे तापमान व ऑक्सिजन लेवल तपासून त्याची नोंद घेण्यात आली.
सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समूह यांनी विद्यार्थ्यांचे मनपूर्वक स्वागत केले. या स्वागत समारोहासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वारजे विभागाचे सहाय्यक प्रशासकीय अधिकारी श्री. शंकर मांडवे सर हे आवर्जून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटण्यात आले.
मा. प्रशासकीय अधिकारी यांच्या समवेत शिक्षकवृंद ..
मा. प्रशासकीय अधिकारी यांच्या समवेत शिक्षकवृंद ..
मुलांच्या तापमानाची नोंद
सॅनीटायझर ने निर्जंतुकीकरण
सॅनीटायझर ने निर्जंतुकीकरण
मास्क वाटप करतांना
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ :
बुधवार, दि. १४ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ठीक ८:३० वाजता पंडित दीनदयाळ विद्यामंदिर, पुणे मनपा मॉडेल शाळा क्र ७४ (मुलींची) या मराठी माध्यमाच्या शाळेत “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती” साजरी करण्यात आली. याप्रसंगी विविध स्पर्धांचे जसे वक्तृत्त्व स्पर्धा, निबंध स्पर्धा तसेच कोरोना काळातील झालेल्या डीजीटल क्रांतीचा उपयोग करून “ऑनलाइन प्रश्नमंजुषा” इत्यादींचे आयोजन विद्यालयातर्फे करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
प्रभारी मुख्याध्यापिका सौ. शशिकला चव्हाण यांच्यासह विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतरवृंद यांच्याहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहण्यात आली. उपस्थित सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू-भगिनी तसेच विद्यार्थ्यांनी पुष्प समर्पित करून अभिवादन केले. विद्यार्थ्यांचे निबंध व चित्र यांचे सर्व शिक्षकवृंदांकडून कौतुक करण्यात आले. तर ऑनलाइन प्रश्नमंजुषेत सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बालवाडी व प्राथमिक विभागाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी विशेष योगदान दिले.
गुरुवार, दि. १८ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ठीक ११:०० वाजता पंडित दीनदयाळ विद्यामंदिर, पुणे मनपा मॉडेल शाळा क्र ७४ (मुलींची) या मराठी माध्यमाच्या शाळेत एकूण ४ शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळा प्रवेश देण्यात आला.महाराष्ट्र शासनाने दि. ०१ मार्च २०२१ ते १० मार्च २०२१ या कालावधीत शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी विशेष शोध मोहीम राबविली. यामध्ये पुणे मनपाच्या सर्वशिक्षा अभियान विभागातर्फे शाळानिहाय सर्वेक्षणाची जबाबदारी शिक्षकांना सोपविण्यात आली.
पुणे मनपा मॉडेल शाळा क्र ७४ (मुलींची) शाळेतील शिक्षकांनी सरासरी १०० कुटुंबे प्रत्येकी याप्रमाणे शाळेच्या जवळील भीमनगर, सुतारदरा, जवाहर कॉलोनी वसाहत, संजयगांधी वसाहत आदी गरीब पाडे, वस्त्या येथे शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले. या परिसरातून एकूण ७ विद्यार्थी शाळा बाह्य आढळून आले, विद्यालयाच्या बालवाडीसह शिक्षिकांनी या विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या पालकांची वस्तीत जाऊन भेट घेतली व त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले.
एकूण ७ पैकी ४ विद्यार्थी यांनी आज रोजी आपला शाळा प्रवेश मॉडेल शाळा क्र ७४ (मुलींची) येथे निश्चित केला तर उर्वरित ३ पैकी २ विद्यार्थी हे मनपाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रविष्ठ झाले. याशिवाय एका विद्यार्थ्याने खाजगी इंग्रजी शाळेत आपला प्रवेश निश्चित केला.
एकूणच समस्त शिक्षकवृंद यांनी केलेले सर्वेक्षण व बालवाडी विभागातील शिक्षकांच्या गृहभेटी यामुळे शाळाबाह्य विद्यार्थी शाळेच्या मुख्यप्रवाहात दाखल झालेत.
शिक्षणमंडळ, पुणे मनपा बरखास्त झाल्यानंतर प्रथमच पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण समिती अध्यक्ष पदी, अभ्यासु, कार्यतत्पर व समाजकार्याची सदोदित आवड असणाऱ्या सौ. मंजुश्रीताई संदीप खर्डेकर यांची नियुक्ती झाली. जागतिक महिला दिन व आ. ताईंचा जन्मदिवस या दोन्ही सुवर्णसंधी साधून विद्यालयातर्फे ताईंचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार शालेय शिक्षण विभाग कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून कार्य पार पाडत आहे. अशावेळी पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या शिक्षण विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना लसीकरण घेणेसंबंधी आदेश देण्यात आले होते. त्यानुसार विद्यालयातील प्राथमिक शिक्षक, बालवाडी शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी लसीकरण करवून घेतले.
शुक्रवार, दि. १९ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ठीक ८:३० वाजता पंडित दीनदयाळ विद्यामंदिर, पुणे मनपा मॉडेल शाळा क्र ७४ (मुलींची) या मराठी माध्यमाच्या शाळेचा परिसर “जय भवानी ! जय शिवाजी !!” , “हर हर महादेव” अशा शिवगर्जनेने दुमदुमला होता. आज मोठ्या उत्साहात स्वराज्याचे संस्थापक अखिल भारतीय जनमाणसांचे आराध्य दैवत, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी विविध स्पर्धांचे जसे वक्तृत्त्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा तसेच कोरोना काळातील झालेल्या डीजीटल क्रांतीचा उपयोग करून “शिवजयंती महोत्सव २०२१ निमित्त - ऑनलाइन प्रश्नमंजुषा” इत्यादींचे आयोजन विद्यालयातर्फे करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
प्राथमिक शिक्षण विभाग, वारजे – कर्वेनगर व पं. दीनदयाळ विद्यामंदिर, मनपा मॉडेल शा.क्र. ७४ (मुलींची) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “शिवजयंती महोत्सव २०२१ निमित्त - ऑनलाइन प्रश्नमंजुषा” ही आजच्या महोत्सवाचे आकर्षणबिंदू ठरली. यामध्ये वारजे – कर्वेनगर परिसरातील मनपा शाळा, खाजगी शाळा तसेच पालक व शिक्षक वृंद यांच्याकडून उदंड प्रतिसाद मिळाला. जवळपास १९७ हून अधिक जणांस ऑनलाईन प्रमाणपत्राचे वितरण देखील करण्यात आले.
प्रभारी मुख्याध्यापिका सौ. शशिकला चव्हाण यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. उपस्थित सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू-भगिनी तसेच विद्यार्थ्यांनी पुष्प समर्पित करून अभिवादन केले. विद्यालयाचे शिक्षक श्री. श्रीकांत देवकर यांनी शिवचरित्रावर आधारित आपले मनोगत व्यक्त केले. तर विद्यार्थ्यांनीही स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर आपआपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांचे निबंध व चित्र यांचे सर्व शिक्षकवृंदांकडून कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बालवाडी व प्राथमिक विभागाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी विशेष योगदान दिले.